Breaking News

पाणबुडी मोटार चोरीला

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे शिवारातील शेतजमिनीतून [गट नं. १६२] चोरट्यांनी पाणबुडी मोटर चोरून नेली. दि. ७ रोजी रात्री आठ ते सकाळी आठ वाजेदरम्यान झगडे फाटा, पोहेगाव गणपती मंदिराजवळ ही चोरी झाली. याप्रकरणी धर्मा जावळे [रा. सोनेवाडी] यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.