ग्रामपंचयातने अंडरग्राऊंड गटारावर झाकण बसवले , लोकमंथन इफेक्ट
बेलपिंपळगाव प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जुन्या बाजार तळावरील उघडी असलेले अंडरग्राऊंड गटाराला अनेक दिवसापासून झाकण गायब झाले होते. त्यात अनेक नागरिक, मुलं खड्यात पडले होते. काही दिवसांपुर्वी गावातील पोलीस पाटील मोटार सायकल सह या खड्यात पडले. सुदैवाने त्यांना या घटनेतून जास्त काही इजा झाली नाही. ही बातमी दैनिक लोकमंथन ने प्रकाशित करताच गावातील ग्रामपंचायात खडबडून जागी झाली व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी लगेच या दोन्ही ठिकाणी जाळी बसून घेतली. गावातून अनेक नागरिकांनी या वेळी दैनिक लोकमंथनचे आभार मानले. अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी काही उपाय योजना झाली नाही पण बातमी येताच हे दोन्ही वरती जाळी बसली. या कामात ग्रामपंचयातने लगेच लक्ष केंद्रित करून लगेच काम केले. गावातून अनेकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला रात्री अपरात्री येणार्यास हे खड्डे दिसत नव्हते आता मात्र ठिकाणी कोणी पडणार नाही त्यामुळं काही अपरीत घटना घडणार नाही त्यामुळं नागरिक खुश आहे
