Breaking News

निपाणीवडगावच्या सरपंचपदी आशिष दौंड


श्रीरामपूर ( प्रतिनिधी )  

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या निपाणीवडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या गटाचे आशिष सुरेशराव दौंड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
निपाणीवडगाव ग्रामपंचायतमध्ये मुरकुटे गटाचे वर्चस्व आहे. विद्यमान सरपंच रविंद्र पवार यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नुतन सरपंचपदाच्या निवडीसाठी अशोक साखर कारखान्याचे चेरमन सोपान राऊत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी सर्कल अशोक बनकर यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची नुतन सरपंच निवडीसाठी मिटींग झाली. सदर मिटींगमध्ये आशिष दोंड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीसाठी सरपंच रविंद्र पवार, उपसरपंच ताई जायभाय, सदस्य अंबादास जाधव, हौसाबाई पर्‍हाड, रुपाली राऊत, बिजलाबाई वाघमारे, हमीद शेख, शोभाताई साळवे, राजाबाई लोखंडे, बाळासाहेब राऊत, सुनिता शेळके, बाळासाहेब गायधने, ग्रामसेवक दादासाहेब काळे हे उपस्थित होते.