चिमुकल्यांची वृक्षदिंडीने जनजागृती
बेलपिंपळगाव प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेने गावातून प्रभात फेरी काढून वृक्ष लागवडचे महत्व फलकाद्वारे नागरिकांना सांगितले. यावेळी या चिमुकल्या मुलांनी वृक्ष लागवडीच्या घोषणा दिल्या. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामपंचायत मार्फत एक एक रोपटे देण्यात आले होते . त्यांनी ते घरी लावणार असल्याचे विद्यार्थ्यांनी मानस केला आहे . ही प्रभात फेरी गावातील चौकात आली असता चंद्रशेखर गटकळ, पोलीस पाटील संजय साठे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ शिंदे, शिवाजी कांगुणे, अशोक कनगरे, अनिल वरघुडे या ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक बुधा गोढे, कल्याण शिंदे,दौलत तुवर,दीपक पवार,कोकणे अण्णासाहेब,शरद पवार, सुरेश पंडुरे,सुभाष भांड,नांदे ज्योती,संगीता बैरागी, हे उपस्थित होते.
