Breaking News

सिंहगड घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद


पुणे : सिंहगड घाटात रविवारी पहाटे दरड कोसळली. यामुळे गडावर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने गडावर पर्यटक नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. सिंहगड, खडकवासला हे पुण्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ असल्याने शनिवार रविवार सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. मात्र, या रविवारी पर्यटकांची निराशा झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आज दिवसभर सिंहगडावर जाणारी वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.