Breaking News

स्थापनेपूर्वीच ‘जिओ’ देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

देशातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केली. या यादीत अजून स्थापन न झालेल्या जिओ या शैक्षणिक संस्थेला सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेचा दर्जा दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलेल्या 6 शैक्षणिक संस्थेच्या यादीत आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयएसएससी बंगरुळू, या शासकिय संस्थांचा समावेश आहे. तर खासगी क्षेत्रातील मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि जिओ या संस्थांचा समावेश आहे. यातील जिओ या शैक्षणिक संस्थेची स्थापना होणार आहे. त्यामुळे स्थापनेआधीच जिओ शैक्षणिक संस्थेला सरकारच्या उच्च शिक्षणासाठीच्या नियमातून सवलत मिळाल्याचेच बोलले जात असून याचा नक्की ठावठिकाणा सरकारकडूनही जाहीर करण्यात आलेला नाही.