Breaking News

अकोले रोटरी क्लबची नूतन कार्यकारिणी जाहीर

रोटरी क्लब अकोलेची सन 2018-19 या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी रो. सचिन देशमुख, सचिव पदी रो. सचिन शेटे, उपाध्यक्षपदी रो. सुनील नवले व खजिनदार पदी रो. रोहित गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. अमोल वैद्य यांनी ही माहिती दिली.

रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी सामाजिक संस्था आहे. गत वर्षी अकोले येथे रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली. स्थापनेनंतर प्रथम अध्यक्ष रो. अमोल वैद्य व सचिव रो. सचिन आवारी यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे या क्लबला पहिल्याच वर्षी बेस्ट न्यू क्लब व उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष प्राविण्यचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावर्षीदेखील क्लबच्या माध्यमातून सर्वसमावेशक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रो. सचिन देशमुख व सचिव सचिन शेटे यांनी सांगितले. सन 2018 - 19 या वर्षाकरिता संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये क्लब ट्रेनर कर सल्लागार रो. शांताराम हासे, आय पी पी. रो. डॉ. रवींद्र डावरे, सार्जंट ऍट आर्म्स रो. संदेश धुमाळ, क्लब अ‍ॅडमीन रो. कल्पेश वराडे, मेम्बरशीप डायरेक्टर रो. तेजस भिंगारे, सर्व्हिस प्रोजेक्ट ग्लोबल रो. श्रीकांत नाईकवाडी, सर्व्हिस प्रोजेक्ट लोकल रो. तुषार सुरपुरीया, पब्लिक इमेज रो. मयूर रासने, युथ सर्व्हिस रो. यश चोथवे, डिलिवरी इमपायसिस रो. अ‍ॅड. अमोल धुमाळ, लिटरसी डायरेक्टर रो. हेमंत मोरे, टीआरएफ रो. अरूण सावंत, आरआय इम्फायसिस सी.ए. रो. असिफ शेख, बुलेटिन संपादक प्राचार्य रो. विद्याचंद्र सातपुते, आयटी मीडिया रो. दत्ता वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे आ. वैभव पिचड यांचेसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.