Breaking News

एसटी महामंडळ वेतनकराराला राज्य सरकारची मंजुरी

मुंबई/प्रतिनिधी ।
एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांचा 2016 ते 2020 च्या वेतनकराराला राज्य सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून नवीन वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा कर्मचार्‍यांना जून महिन्यापासून मिळणार्‍या पगारासाठी होणार आहे. कर्मचार्‍यांचे जूनपासूनचे पगार वाढून येणार आहेत. या वेतनवाढीमुळे आता कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होणार आहे.
एसटी कर्मचार्‍यांचा दर चार वर्षांनी वेतनकरार होतो. मात्र 2016 ते 2020 चा वेतनकरार करण्यासाठी एसटी प्रशासन आणि मान्यता प्राप्त संघटनांमध्ये एकमत होत नव्हतं. त्यामुळे हा वेतनकरार अनेक दिवस रखडूनच होता. या वेतनकरारासंदर्भात 33 बैठका पार पडल्या असल्याने याप्रश्‍नावर निर्णय होणार की नाही असाच काहीसा प्रश्‍न कर्मचार्‍यांपूढे होता. या प्रश्‍नावर गेल्या अनेक वर्षापासून एकमत होत नसल्याने हा प्रश्‍न तसा प्रलंबीत होता. मात्र, आता हा प्रश्‍न मार्गी लागल्याने महामंडळातील कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होणार आहे. अखेर आता राज्य सरकारनेच कामगार कराराला मंजुरी दिल्याने एसटी कर्मचार्‍यांसाठी हा वेतनकरार लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.