Breaking News

चांदा येथे नुतन शिक्षकांचे स्वागत,बदली झालेल्यांना निरोप


चांदा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नुकत्याच बदल्या झाल्या त्यांना निरोप देण्यात आला तर नवीन हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. 
चांदा शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक इंगळे काटकर गोंटे, शहाणे , मोरे, खेडकर , शिंदे या शिक्षकांची जिल्ह्यातील इतर शाळेत बदली झाल्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या शाळेतील आपल्या विध्यार्थ्यांना जाताना आपल्या भावना व्यक्त करताना शिक्षक व शिक्षिकांना रडू कोसळले .त्याच बरोबर बाल चिमुकले देखील रडत होते. तर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी आर.पी.इंगळे, गोंटे, काटकर, श्रीमती रुपाली खेडकर , श्रीमती मरकड, शामराव पवार, गणपत पुंड, किरण जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब दहातोंडे होते . तर प्रमुख मान्यवर म्हणून भाजपाचे कैलास दहातोंडे , शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष किरण जावळे, शहाजी धुमाळ, सोमनाथ धुमाळ, गणपत पुंड, उत्तम पुंड, बंडू दहातोंडे,सोमनाथ धुमाळ,अन्ना दहातोंडे हे होते. नवीन आलेल्या मुख्यध्यापक श्रीमती गारुडकर, भास्कर मरकड, जाधव श्रीमती मरकड, श्रीमती जाधव, श्रीमती किंभवणे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर मरकड यांनी केले. तर आभार किरण जावळे यांनी मानले.