Breaking News

मालवाहतुक टेम्पो पलटी होवून, करपडी फाट्यावर चालक ठार


कुळधरण :प्रतिनिधी - भिंगवणहुन राशिनकडे येत असलेल्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाल्याची घटना रविवार ( दि. 1 जुलै) रोजी दुपारी घडली. राशिन नजिकच्या करपडीफाटा येथे झालेल्या या अपघातात चालक जागीच ठार झाला. संजय प्रकाश मोदी (वय 38) रा.कर्जत असे अपघातातील मयताचे नाव आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात टेंम्पो क्रमांक एम.एच.14/5393 अपघातग्रस्त झाला. अपघातात चालकाच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मयताचे भाऊ राजेश प्रकाश मोदी यांनी यासंदर्भात कर्जत पोलीसात खबर दिली. टेम्पो रिकामा असल्याने वेगाने पलटी झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस हवालदार एम.आर.गाडे करीत आहे.