Breaking News

विद्यार्थ्यांना घडवणारे शिल्पकार शिक्षकच - दिलीपराव लांडे


भाविनिमगाव प्रतिनिधी - विद्यार्थीदशेत मुलांना योग्य मार्गदर्शन करुन घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. म्हणून विद्यार्थी घडवणारे खरे शिल्पकार शिक्षकच आहेत. गावकर्‍यांकडून होणारा सन्मान म्हणजे शिक्षकांनी केलेल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे यांनी केले. शेवगांव तालुक्यातील भायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव शिंदे, सहशिक्षक अंबादास रुईकर व निलकंठ लबडे यांची नुकतीच बदली झाल्याने ग्रामस्थांनी निरोप समारंभ आयोजित करुन त्यांचा गौरव करण्यात आला. तर नव्याने हजर झालेल्या रोहिणी साबळे, सुवर्णा कदम या शिक्षिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीपराव लांडे होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जि.प.सदस्य रामभाऊ साळवे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, बाबुलाल सय्यद, संतोष मेरड, अजय नजन, भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, माजी सरपंच राजेंद्र आढाव, अण्णासाहेब दुकळे, उपसरपंच संदिप शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी शासनाच्या नियमानुसार येथील मुख्याध्यापक शिंदे, शिक्षक लबडे, रुईकर यांच्या बदली झाल्यामुळे पालकामध्ये नाराजी पसरली. बदली रद्द करण्यासाठी काही पालकांनी प्रयत्न केले मात्र प्रशासनाने त्यास नकार दिला. काही ठिकाणी शिक्षकांच्या बदलीसाठी आंदोलने होतात मात्रं याठिकाणी शिक्षकांची बदली झाल्याने गावकर्‍यांनी गौरव केला. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या शिक्षकांची खरी गरज आहे. अशा प्रतिक्रिया उपस्थित पालकामध्ये चर्चा होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सरपंच राजेंद्र आढाव यांनी केले. सुत्रसंचालन आदर्श शिक्षक रामभाऊ गवळी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रामनाथ खरड यांनी मानले. यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भगवान आढाव, रामनाथ आढाव, शेषराव दुकळे, कडुबाळ दुकळे, विठ्ठल आढाव, सखाराम शेकडे, अ‍ॅड. सागर चव्हाण, किसन चव्हाण, सुदाम खंडागळे, कामगार पोलीस पाटील बबनराव सौदागर, आराधना बचत गटाच्या अध्यक्षा नबाबाई जगधने, अण्णासाहेब ज-हाड, नारायण आढाव, संतोष आढाव, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अशोक देशपांडे, रावसाहेब घाडगे, किसन लांडे, पांडुरंग आढाव आदींसह विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी शाळेची गुणवत्ता ढासळत चालली असल्याचा आरोप वारंवार होत असताना ग्रामीण भागातील एका शाळेला आय.एस.ओ.मानाकंन मिळवून देण्याच भाग्य मिळाले. बदली झाल्यानंतर आम्हाला गावकर्‍यांनी निरोप समारंभ आयोजित करुन सन्मान केल्याने स्मृती मिळेल अशी प्रतिक्रिया शिंदे, लबडे, रुईकर यांनी दिली.