Breaking News

‘फेक न्यूज’बाबत माध्यम प्रतिनिधींसाठीच्या कार्यशाळेचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


नागपूर : समाजमाध्यमांमधून पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे दुर्दैवीघटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांमध्ये जाणीव जागृतीहोण्यासाठी फेक न्यूजबाबत शुक्रवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता प्रेसक्लब येथे माध्यम प्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येणारआहे. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालकब्रिजेश सिंह, संचालक शिवाजी मानकर, नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरिषबोरकर, नागपूर प्रेस क्लबचे प्रदीप मैत्र, पी.आय.ई.टी.चे प्राचार्य डॉ. विवेकनानोटी, दैनिक हितवादचे शहर संपादक राहुल पांडे उप‍‍स्थित राहतील.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, प्रेस क्लब, पी.आय.ई.टी. यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यशाळेत सकाळी 8.30 वाजता नोंदणी होणार आहे. या कार्यशाळेत ‘फेकविरुध्द खरी न्यूज’ याविषयी डॉ. विवेक नानोटी, ‘सोशल मीडियाचा प्रभाव’यावर माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, ‘सोशल मी‍डिया आणिफेक न्यूज’ याबाबत सायबर एक्सपर्ट महेश राखेजा मार्गदर्शन करतील. कार्यशाळेला सर्व माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन माहिती वजनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.