Breaking News

वारीच्या वाटेवरील वारकऱ्यांनी धरला संवादवारीतील शाहिरांच्या डफावर ताल



लोणंद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर संवादवारी उपक्रमामध्ये छायाचित्र प्रदर्शन, पथनाट्य, चित्ररथ तसेच शाहिरीच्या माध्यमातून शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती वारीच्या वाटेवर उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणून लोणंद येथे शाहिरीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शाहिरांनी डफावर ताल धरताच जलयुक्त शिवार योजनेचा उल्लेख केला. त्यांच्या सोबतच उपस्थित वारकऱ्यांनी देखील टाळ्यांच्या गजरात साथ दिली. शाहिरांच्या प्रत्येक शब्दाला दाद देऊन वारकऱ्यांनी तल्लीन होऊन माहिती ऐकली.

शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांची माहिती, या उपक्रमाद्वारे शेतकरी व नागरिकांना मिळत असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी वारकऱ्यांनी व्यक्त केली.