Breaking News

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावगड महत्वाची : राणी लंके

सुपा / प्रतिनिधी  
पारनेर तालुक्यातील हंगा येथे मंगळवारी अनुसुचित जाती, जमाती, खुला प्रवर्ग यांना 75 टक्के अनुदानातुन वनविभागाच्यावतीने मोफत गॅसचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा भिंगे, जि. प. सदस्या राणी लंके, वनरक्षक अश्‍विनी सोळुंखे, संयुक्त वनस्थापन समितीचे अध्यक्ष धोंडीभाऊ नगरे, सरपंच राजेंद्र शिंदे, तसेच ग्रा. सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी राणी लंके म्हणाल्या की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावगड महत्वाची असून, त्याचे संगोपण होणे तितकेच महत्वाचे आहे. तालुक्यात शासकीय योजनेचा गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. अवैध वृक्षतोड होणार नाही, यासाठी वनविभागामार्फत ही शासकिय योजना अंमलात आणली आहे. तसेच जंगलात अवैध चराई व अतिक्रमण होणार नाही. जंगलास आग लागल्यास जतन केलेल्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते टाळण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा वनपाल पल्लवी जगताप यांनी व्यक्त केली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा भिंगे यांनी वनसंवर्धन व वनसंरक्षण याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.