सर्वोदय विद्यालयास शालेय वस्तुंचे वाटप
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा महत्वाचा घटक असून, त्यांना विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी तसेच शाळेविषयी आवड निर्माण होण्यासाठी, त्यांची बौद्धिक क्षमता आजमावने महत्वाचे असते. या बौद्धीक वाढीसाठी शालेय पुस्तकांबरोबरच शालेय साहित्यदेखिल महत्वाची भुमिका बजावतात. या संकल्पनेतुनच पंचममहादेव वर्माजी फाऊंडेशन मुंबई यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अभिरूची आजमावून सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे (ता. अकोले) येथील विद्यालयास विनामुल्य शालेय साहित्य भेट दिले. पंचममहादेव वर्माजी फाऊंडेशन मुंबई यांचेकडून विद्यालयास 21 हजार सातशे रुपयांचे इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना पंधरा सेट पुस्तके दिली. तसेच इयत्ता 5 वी ते 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सहाशे वहया, गणकयंत्र, स्टेपलर तसेच आदी शालेय पुस्तके मोफत भेट दिली. यासाठी जनरल मिल्सचे अधिकारी सौरभ पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर साहित्य प्राचार्य अंतुराम सावंत यांचे उपस्थित विदयार्थ्यांना वितरीत करण्यात आले. याप्रसंगी दिपक पाचपुते, शशिकांत कुलकर्णी, संपत धुमाळ, भरत भदाणे, नानासाहेब शिंदे, कविता वाळुंज, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे, लिपिक भास्कर सदगीर, सुभाष बेणके, सुनिल देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सत्यानिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहर देशमुख, सचिव टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा तसेच संचालक मंडळ आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.