Breaking News

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे दोघे ताब्यात


राजुर / वार्ताहर
अवैध देशी दारुची वाहतूक करणार्‍या महिंद्रा गाडीसह पाच लाख दोन हजार चारशे त्र्यान्नव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजुर पोलीसांनी धडक कारवाई करत कोल्हार घोटी पिंपरकने रोडवर ही कारवाई करण्यात आली. यातील दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन, यातील पहीला आरोपी तानाजी कालु झांबाडे (वय 27 वर्ष) तर, दुसरा आरोपी विठ्ठल हिरामन पोटकुले (वय 19 वर्ष) हे दोन्हीही राहणार मान्हेरे ता. अकोले येथील रहिवाशी आहेत. दोघेही अवैधरीत्या वाहनातुन दारुची वाहतुक करत असल्याची फिर्याद पोलीस कॉन्टेबल प्रविन थोरात यांनी राजुर पोलीसांना दिली असुन, याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पी. आर. निनसे हे अधिक तपास करत आहेत.