Breaking News

गरिबांसाठी मोफत उपचार शिबिर काळाची गरज : काळे खा. सुळेंच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांची तपासणी



कोपरगाव ता. प्रतिनिधी

धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष होते. त्यामुळे शरीराला अनेक व्याधी जडल्या जातात. जर या शारीरिक व्याधींचे वेळेवर निदान व उपचार केले नाही तर सर्वसामान्य नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते. वेळप्रसंगी आरोग्याकडे केलेले हे दुर्लक्ष जीवावरही बेतू शकते. आजही समाजातील कित्येक नागरिक आर्थिक अडचणीमुळे उपचार घेवू शकत नाही. अशा नागरिकांसाठी मोफत उपचार शिबिर काळाची गरज बनले आहे, असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले. 

कोपरगाव येथे मोफत उपचार शिबिराचे उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी {दि. ३० } येथील कृष्णाई मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ, प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांचे संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी, कोपरगाव तालुका डॉक्टर राष्ट्रवादी सेल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ७१० रुग्णांची विविध आजारांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.

याप्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन तज्ञ डॉ. अभिमन्यू कडू, नेत्ररोग तज्ञ डॉ. पंकज बडोले, दंतरोगतज्ञ डॉ. पूर्णिमा झगडे, समाजसेवक भरत वर्पे, प्रवरा हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी घुले व त्यांचे सहकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विधाटे तसेच पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, तालुका महिला अध्यक्षा चित्रा बर्डे, शहराध्यक्षा नगरसेविका प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सदस्या विमल आगवन, सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, पूर्णिमा जगधने, जिनिग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रोहिदास होन आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.