डॉ. मेहता कन्या विद्यालयात पालक मेळावा उत्साहात
कोपरगाव ता. प्रतिनिधी
येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे माजी निरीक्षक एन. एस. सोनवणे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य अॅड. अशोक टूपके, प्राचार्या एम. एस. सुरवसे, उपप्राचार्य बी. के. गवळी,पर्यवेक्षिका एम. डी. राजेभोसले, पालक प्रतिनिधी युसुफ रंगरेज, गिरीधर पवार आदींच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रारंभी शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. उपाध्यक्ष्यपदी रायभान पाटील, सहसचिवपदी अलका आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अॅड. अशोक टूपके यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तर विभागाचे माजी निरीक्षक एन. एस. सोनवणे यांनी रयत गुरुकुल प्रकल्पाविषयी माहिती दिली. विद्यालयाच्या प्राचार्या सुरवसे यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. निकम यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती दिघे यांनी आभार मानले.