Breaking News

पावसाळी अधिवेशनच्या दुसर्‍या दिवशी विरोधकांचा गदारोळ

पावसाळी अधिवेशनच्या दुसर्‍या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. सभागृहात तसेच सभागृहाबाहेर सरकारची कोंडी क रण्याचा प्रयत्न केला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्‍नोत्तराचा तास रद्द करून सिडकोच्या जमीन घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. प्रश्‍नोत्तराच्या तास रद्द करण्यासंदर्भात 57 ची नोटीस ही दिली असून, या मुद्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मुख्यमंत्री आणि मं त्रिमंडळातील मंत्री राज्याच्या तिजोरीवर दरोडा घालत आहेत, जनतेच्या दृष्ष्टीने अतिशय महत्वाचा विषय असून यावर बोलू देण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली.