Breaking News

राक्षसवाडी खुर्दला वृक्षारोपण मोहीम


कुळधरण / प्रतिनिधी 
कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड संकल्पाला साथ देत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कोपनर, मुख्याध्यापक सुद्रिक, ज्येष्ठ नागरीक नारायण कोपनर, जयसिंग देवकाते, देविदास कोपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण झाले. युवक तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन महेंद्र कोपनर यांनी केले. सचिन कोपनर, सतिश अस्वले, शिवाजी कारंडे, जयसिंग देवकाते, शहाजी पिंगळे, दत्तु कारंडे, रविराज काळे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.