Breaking News

आहिरे आणि गायकवाड यांना महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान

कोपरगाव ता. प्रतिनिधी तालुक्यातील धामोरीच्या पूजा विनोद अाहिरे आणि शामल नितीन गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणारा महिला उद्योजिका पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे, सेक्रेटरी, स्मॉल अँड मेडीयम इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट कमिशनर डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राज्यस्तरीय महिला उदयॊजिका कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत मूळच्या कोपरगाव तालुक्यातील शामल नितीन गायकवाड या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सोनुबाई दशरथ भाकरे यांच्या नात सून आहेत. तर पूजा विनोद आहिरे या माजीमंत्री शंकरराव कोल्हे याचे विश्वासू कार्यकर्ते मारुती आहिरे यांच्या सून आहेत. अहमदनगर येथील अंबादास चंद्रकांत यन्नम यांच्या त्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण एम सी एम, बी. कॉम झालेले आहे. विनोद आहिरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. ते कामाच्या शोधार्थ पुणे येथे आले. जिद्द आणि चिकाटी तसेच पूजा अहिरे यांच्या साथीच्या जोरावर त्यांनी आज पुणे येथे विनिमॅक्स इंडस्ट्रिज कंपनी उभी केली आहे. हॉस्पिटल बेड, चारचाकी वाहनांचे सीट फ्रेम, झोपाळे, लाइटपोल आणि हेव्ही फॅब्रिकेशनचे आदी उत्पादने या कंपनीत तयार होतात. दरम्यान, या पुरस्काराबद्दल माजीमंत्री शंकरराव कोल्हे, शिर्डीचे संस्थांचे विश्वस्त बिपिन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे आदींसह अनेकांनी आहिरे आणि गायकवाड यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेछा दिल्या.