विविध कामांसाठी 3 कोटी 22 लाखांचा निधी : आहेर
जामखेड / श. प्रतिनिधी
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने 1 कोटी 57 लाखांची विविध प्रकारचे विकास कामे पूर्ण झाली आहेत. तसेच शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक कामांसाठी 3 कोटी 22 लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी सांगितले. राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा एकर जागेत जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 200 वृक्ष लागवड करून राज्य शासनाच्या वन अच्छादन वाढविण्याच्या उपक्रमात जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी सभापती गौतम उतेकर, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, तानाजी टेकाळे, संचालक सागर सदाफूले, सूभाष जायभाय, अरूण महारनवर, बाजीराव भोंडवे, रावसाहेब बोराटे, शिलाभाई शेख, पृथ्वीराज वाळूंजकर, यांच्यासह शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण कांबळे यांनी तर, सूत्रसंचालन अशोक यादव यांनी तसेच आभार वाहेदभाई सय्यद यांनी मानले.