Breaking News

आनंदने कार्लसनला बरोबरीत रोखले


नॉर्वे वृत्तसंस्था

माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये बरोबरी करण्यास भाग पाडले.कार्लसनने याआधीच्या दोन सामन्यांमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना विजयाची नोंद केली होती. मात्र आनंदविरुद्ध कार्लसनला फारसा प्रभाव पाडता आला नाही. ४५व्या चालीनंतर कार्लसनने बरोबरी मान्य केली. दरम्यान, डिंग लिरेनने दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आनंदने त्याच्याविरोधात सामना जिंकून कमावलेला अर्धा गुण आनंदच्या नावावरून कमी झाल्याने आनंद आता संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने होत असलेल्या या स्पर्धेत आनंदचे अजून चार सामने बाकी असल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान अद्याप कायम आहे.