Breaking News

प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात योगदिन उत्साहात


राहाता प्रतिनिधी येथील डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभान डांगे यांच्या प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात नुकताच राहाता पंचायत समितीच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सुमारे साडे तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. राहाता तालुका गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार बारवकर, पोलीस निरीक्षक कदम, शिक्षण विस्तार अधिकारी वाकचौरे, राऊत, त्रिभुवन, प्रीतिसुधाजी स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश डांगे आदी उपस्थित होते. योग प्रचारक सुनिता तांबे व योग प्रशिक्षक संतोषकुमार पांडे यांनी यावेळी योगाच्या विविध योगासनांचे धडे दिले. प्रीतिसुधाजी स्कूलच्या उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, प्राचार्य किशोर निर्मळ, राहाता ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. कुलकर्णी, डॉ. फंड, प्राचार्या नन्नवरे, गमे, शिवाजी देवढे आदींसह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.