जखमी जवान जगात यांची विखेंनी घेतली भेट
राहाता प्रतिनिधी
पाकिस्तानशी लढताना सीमेवर जखमी झालेले जवान, राहाता तालुक्याचे भूमिपुत्र राजेंद्र जगताप यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.
सांबा बॉर्डरवर कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जवान राजेंद्र जगताप जखमी झाले होते. या घटनेनंतर जगताप प्रथमच गावी आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी या वीर जवानाचे निमगाव कोर्हाळे ग्रामस्थांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले होते.
विरोधी पक्षनेते विखे यांनी जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन जवान जगताप यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार माणिकराव आहेर, सभापती हिरा कातोरे, उपसभापती बबलू म्हस्के आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
