Breaking News

काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शिंदे




कोपरगाव ता. प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सुनील शिंदे एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे आणि कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे मावळते उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी सुनील कारभारी शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंतराव भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक सह संचालक (साखर) अहमदनगर श्रीमती संगिता डोंगरे व सहाय्यक म्हणून सूरम यांनी काम पाहिले.