Breaking News

वळण -मांजरी परिसरात आढळला महिलेचा मृतदेह




राहुरी विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील वळण शिवारात आज { दि. २३} सकाळच्या दरम्यान वळण -मांजरी रस्त्याच्या कडेला ३० ते ३२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा गळा आवळून तिला ठार करण्यात आले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या मृतदेहाची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.

याप्रकरणी पोलीस पाटील सोमनाथ डमाळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप पवार, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलिस नाईक गुलाब मोरे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत घटनेची माहिती घेतली.

वळण-मांजरी रोडवर खिलारी यांच्या शेत जमिनीशेजारी असलेल्या खड्ड्यातील झाडाझुडूपांत या महिलेचा मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या अंगठ्याजवळ इंग्रजी अक्षरात ‘जी’ व कांबीवर ‘जी ए’ असे गोंदलेले आहे.

या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास राहुरी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पो. नि. अविनाश शिळीमर यांनी केले आहे.