Breaking News

‘त्यांच्या’ सेवानिवृत्तीत संजीवनी परिवार सहभागी : कोल्हे


कोेपरगांव शहर प्रतिनिधी :
आज औद्योगिक उत्पादन करणारे कारखाने धडाधड बंद पडत आहेत. खाजगीचे प्रस्थ वाढत आहे. त्यातील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. संजीवनी कारखान्यावर ज्या ज्यावेळी संकटे आली, त्यात शेतकरी सभासदांबरोबरीने कामगारांनी मोलाची साथ दिली. व्यवस्थापनांस नेहमीच सहकार्य केले. त्यांच्या सेवानिवृत्तीतही संजीवनी परिवार सहभागी आहे, असे प्रतिपादन संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी 
केले.

तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी साखर कारखान्यांच्या प्रदीर्घ सेवेतून ६० कामगार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती समारंभ सोमवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे. याप्रसंगी आ. स्नेहलता कोल्हे, उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, उपाध्यक्ष त्रंबकराव सरोदे, विश्वसराव महाले, केशव भवर आदी उपस्थित होते. प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, रासायनिक सरव्यवस्थापक राजेंद्र सूर्यवंशी, प्रकाश चांदगुडे, प्रकाश डुंबरे यांनी कामगारांचे स्वागत केले. कोपरगांव तालुका साखर कामगार सभेचे सचिव मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचलन कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, खालकर व त्यांच्या सहका-यांनी केले. मनोहर शिंदे यांनी आभार मानले.