ज्ञानगंगा विद्यानिकेतनचा १०० टक्के निकाल
आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतनचा इयत्ता १० वी. चा १०० टक्के तर आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा ९२.९१ टक्के निकाल लागला. आश्वी केंद्रात १० वी. मध्ये केंद्रात प्रथम येण्याचा मान ज्ञानगंगेच्या विद्यार्थ्याला मिळाला आहे.
ज्ञानगंगा विद्यानिकेतनमधील साक्षी बाळकृष्ण भुसाळ (९५.६० टक्के) हिने प्रथम क्रमांक मिळविला. अक्षदा रंगनाथ गिते (९४.४० टक्के) द्वितीय, संदेश विलास तिकांडे (९३.८० टक्के) गुण मिळवत तृतीय, चतुर्थ क्रमांक तेजस बाळकृष्ण एखंडे (९२.४० टक्के), पाचवा क्रमांक श्रद्धा भाऊसाहेब उंबरकर (९१.८० टक्के) गुण मिळवले आहेत.
या परीक्षेसाठी एकूण ९६ विद्यार्थी बसले होते. यापैकी ९० च्या पुढे १६ विद्यार्थी, ८५ पुढे २५ विद्यार्थी, ८० च्या पुढे १५ विद्यार्थी व ७५ टक्याच्या पुढे ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल आश्वीचा ९२.९१ टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक प्रियंका अशोक चतुरे (९३.४० टक्के), द्वितिय क्रमांक आरती सोमनाथ घोलप (९१.२०) व अक्षय किसन शेटे (९१ टक्के) गुण मिळवले आहेत. यावेळी विद्यालयातील ३८ विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य, ४५ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी, ३३ विद्यार्थ्यानी द्वितिय श्रेणी व १९ विद्यार्थ्यानी तृतीय श्रेणी मिळवली आहे.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षकाचे संस्थाप्रमुख अँड. शाळीग्राम होडगर, संचालिका निलिमा गुणे, कार्यकारी अधिकारी एन. एम. मंडलिक, सेक्रेटरी जमाल तांबोळी, प्राचार्य विजय पिसे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, वर्गशिक्षक गुरुदास होले, रवी खेमनर, शितल सांबरे, प्रा. किसन हजारे आदींनी अभिनंदन केले आहे.