Breaking News

खूनप्रकरणी फरार आरोपी जेरबंद


कोपरगाव : शहरातील शाम कैलास चव्हाण या तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सचिन उर्फ जंगल्या गणेश साटोटे याला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंमळनेर येथून दुचाकीसह ताब्यात घेतले. 

शुक्रवारी {दि. ८} रात्री एक ते दीडच्या दरम्यान भगवा चौक, गांधीनगर येथे व सचिन उर्फ जंगल्या गणेश साटोटे यांच्यात भांडण झाले होते. त्यात शामच्या डोक्यात दगड मारून, जबर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान शामचा मृत्यू झाला. याप्रकरणी सचिन साटोटे याच्याविरुद्ध निलेश प्रदीप चव्हाण याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.