राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करणार : गोंदकर
शिर्डी : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नजिकच्या काळात पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका लोकांना समजावून सांगणार आहोत. लोकांच्या अडचणी समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करणार आहोत असा निर्धार राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष दीपक गोंदकर यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी जिल्हा विद्यार्थी संघटना कार्यकर्त्यांच्या उपस्थित मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला सरचिटणीस प्रसाद पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अभिषेक शेळके, सुनील गोंदकर, प्रकाश गोंदकर, जावेद शेख, विशाल भडांगे, अमित शेळके, असीम खान, सईद शेख, गणेश बनसोडे,
विशाल कोते, राहुल पोपळघट, साई कोतकर, अशोक त्रिभुवन, विशाल गायकवाड, आकाश जाधव, निवृत्ती वाडेकर, संकेत बोऱ्हाडे
आदींसह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
