अनुजा अब्दुले यांचे सेट परीक्षेत यश
जामखेड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्या फिजीक्स या विषयात 166 मार्क मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. जामखेड़ येथील भिमराव अब्दुले यांच्या कन्या प्रा. कु. अनुजा भिमराव अब्दुले यांनी बीएस्सी विद्या प्रतिष्ठान बारामती, तर एमएस्सी फिजिक्स पुणे विद्यापिठ येथे शिक्षण घेतले.
सेट परीक्षेसाठी या वर्षी महाराष्ट्रातून व गोवा राज्यातून एकूण 62 हजार 404 परिक्षार्थी बसले होते, त्यापैकी केवळ 4067 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना प्रा. डॉ. आडसुळ, प्रा. चिमणपुरे, प्रा. पवार यांचे मार्गदर्षन मिळाले. या यशाबद्दल अनुजा अब्दुले यांचे सर्व स्तरांतुन अभिनदंन होत असून, जिल्हा सहकारी बँकेचे सचांलक जगन्नात राळेभात, सहकार तज्ज्ञ अॅड. नितिन गोलेकर, खर्ड़ा जिल्हा सहकारी बँकेचे सर्व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
