गुरुवारी पहाटे 3 वाजता मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली आहेत. तर काही घरांची पडझड झाली आहे. कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्याच पाऊस हा नुकसानीचा ठरला आहे. पावसाच्या दरम्यान काहीकाळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता मात्र, त्यानंतर अधिकच दमट वातावरण झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत होती.
विजेचाही खोळंबा :
पावसाचे आगमन आणि विजेचा लपंडाव हे समीकरण दरवर्षी ठरलेलेच आहे. त्यानुसार आजही पावसाला सुरूवात होताच, जवळासह परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. दमट वातावरण अन् त्यातच विज गुल झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.