Breaking News

तरुणाईने संतांच्या विचारांचे अनुसरण करावे : काळे


कोपरगाव : संत गाडगे महाराजांनी समाज निरोगी व स्वच्छ राहण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. माणूस, मानवतावाद व माणुसकी आपल्या समाज कार्याचा केंद्रबिंदू ठेवून समाजातील शेवटच्या माणसाचा सर्वांगीण विकास जपण्याचा मानवता धर्म जोपासला. वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील कीर्तनातून समाजातील वाईट प्रवृत्तीवर हल्ला चढविलेल्या संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराजांचे विचार तरुणांनी अनुसरण करावे, असे आवाहन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या धार्मिक व सामाजिक विचारातून कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रणित प्रबोधनपर राष्ट्रीय खंजिरी कीर्तन सोहळा पार पडला. राहाता तालुक्यातील वाकडी, पुणतांबा, चितळी, शिंगवे, आदी ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंज, अमरावती येथील राष्ट्रीय कीर्तनकार विनोद सम्राट ह. भ. प. नारायणदास पडोळे महाराज यांच्या प्रबोधनपर खंजिरी कीर्तनरुपी सेवेचे पहिले पुष्प वाकडी येथे गुंफण्यात आले. या कार्यक्रमात युवा नेते आशुतोष काळे बोलत होते. 
यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, युवा नेते आशुतोष काळे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, जि. प. सदस्या कविता लहारे, पंडीतराव लहारे, राजेंद्र लहारे, अर्चना आहेर, संपतराव शेळके, अमित आहेर, त्रिंबक लहारे, मुरलीधर शेळके, अनिलराव कोते, सुरेश लहारे, कल्याणराव सदाफळ, आण्णासाहेब कोते, जालिंदर कोते, शंकरराव लहारे, भिमाशंकर लोखंडे, विठ्ठलराव शेळके, अनिल रकटे, अंजाबापू रकटे, प्रभाकर येलम, अशोक लभडे, कारभारी भोंडे, शेखर लहारे, बापूसाहेब लहारे आदी उपस्थित होते.