Breaking News

द्राक्ष पिकाच्या माहितीसाठी मोफत प्रशिक्षण


कोपरगाव : द्राक्षांमध्ये रासायनिक उत्पादनांच्या वापराला येत असलेली मर्यादा व त्याचा होत असलेला दुष्परिणाम या बाबीवर मात करून ‘अश्वमेध’ने द्राक्ष घड निर्मितीपासूनच जीवाणूंचा वापर करून विषमुक्त द्राक्ष पिकविण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बाभळेश्वर येथे मोफत प्रशिक्षण दि. ५ जून रोजी ‘अश्वमेध’ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. 
या प्रशिक्षणादरम्यान डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणात परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष रामभाऊ धावणे, अश्वमेधचे प्रशांत आढाव व परिसरातील कृषीसेवा केंद्राच्या संचालकांनी केले आहे.