Breaking News

‘धूमस्टाईल’ने दागिने लंपास


कोपरगाव शहर प्रतिनिधी: 

तालुक्यातील कोकमठाण हददीत जंगली महाराज आश्रमासमोर विना नंबरच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन अज्ञात इसमांनी रंजना प्रकाश चव्हाण {रा. पोलीस वसाहत, नाशिक} यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ‘धूमस्टाईल’ने चोरून नेले. यात २ तोळ्याचे सोन्याचे गंठण, पट्टीमधील रुपये ५० हजार किमतीचे मंगळसूत्र आदींचा समावेश होता. रंजना चव्हाण या लग्नसोहळ्यासाठी चालल्या होत्या. प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.