Breaking News

योग म्हणजे ध्यान साधनेकडे जाणारा मार्ग : सूर्यवंशी


कोपरगाव ता. प्रतिनिधी

योग व ध्यान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर स्वास्थासाठी योग तर मानसिक स्वास्थासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. सुखी जीवनासाठी दैनंदिन योग व ध्यान करणे गरजेचे आहे. योग हा ध्यान साधनेकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, असे प्रतिपादन आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले. 

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल येथे आयोजित ‘जागतिक योग दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. रामदास आव्हाड व डॉ. शिवप्रसाद सानप हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य कांतीलाल पटेल, निरंजन डांगे, सुधाकर मलिक, माणिक जाधव, संदिप गायकवाड, योगेश पुंड सर्व विभागप्रमुख, क्रिडाशिक्षक यांचेसह संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.