Breaking News

ना. विखे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची भावना

ना. राधाकृष्ण विखे यांना लाभलेला पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे आणि पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांना लाभलेला कर्तृत्व संपन्न राजकिय वारसा, विखे कुटूंबाने सहकार, राजकारण, कृषी, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रामध्ये केलेले भरीव कार्य, ना. विखे यांनी मंत्री असताना केलेली विकास कामे व आता विरोधी पक्षनेते म्हणून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये उभा केलेला संघर्ष व आंदोलने यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला ना. विखे आपलेसे वाटतात. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्व सामान्य जनतेची भावना असल्याचेे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील प्रवरा महाविद्यालयामध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. शिरोळे बोलत होते. कार्यक्रमाला पाडळीआळे सरपंच भाऊसाहेब डेरे, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेश शिरोळे, प्राचार्य रावसाहेब पवार, उपप्राचार्य अर्जुन चाटे, प्रा. शरद पारखे, कुंदा कवडे, सुर्यमाला भोेर, गोरख घोलप, मनोहर कनिंगध्वज, राहूल बोरुडे, दशरथ पानमंद, राजेंद्र गोर्डे, संजय दारवंडे, मोहन माने आदी उपस्थित होते.