Breaking News

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हिमालय उन्नतचेतना मानवंदना

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरच्या भाषणात सहिष्णुता, राष्ट्रवाद व समतेचा संदेश देवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांची केमो थेरपी केल्याचे स्पष्ट करीत पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने त्यांना हिमालय उन्नतचेतना मानवंदना देण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या मानवंदना कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, अभिमान शिंदे, अशोक भोसले, अर्चना आढाव, अंबिका नागुल, शांताबाई कुर्‍हाडे, शाहनूर शेख, वंदना शेडगे, अंबिका जाधव आदी उपस्थित होते. 

सव्वाशे वर्षापुर्वी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म आणि भारतीयांच्या सहिष्णूतेबाबत जे विचार मांडले त्याची प्रचिती नुकतीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुर येथे केलेल्या भाषणावरुन आली आहे. या भाषणातून त्यांनी एकप्रकारे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर व भाजपावर केमो थेरपी केल्याचा संघटनेचे म्हणने आहे.
राष्ट्रनिष्ठा ही जात, धर्म, पंथ व प्रादेशिकता यावर अवलंबून नसून, देशातील जनतेबाबत असलेल्या सहिष्णुतेच्या विचारातून राष्ट्रनिष्ठा स्पष्ट होते. तसेच देशातील विविधते मधील एकतेचा संदेश प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातून सर्वांना मिळाला आहे. त्यांचा विचार गौतम बुध्द व महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा या विचारधारेवर अवलंबून आहे. शांतता व सहिष्णुता देशाचा आधारस्तंभ आहे. सत्ताधारी भाजपने सत्ता काळात हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला असून, यामुळे देशातील अल्पसंख्यांक समाजाला वेदना झाल्या असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले. प्रणव मुखर्जी यांचे कार्यकर्तृत्व व विचारांना अभिवादन म्हणून पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने त्यांना उन्नत चेतना मानवंदना देण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने जाहिर करण्यात आले.