Breaking News

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयास एम.एस्सी व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता


संगमनेर ( प्रतिनिधी ) - 
तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची मागणी विचारात घेता शैक्षणिक वर्षे 2018-2019 साठी महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे एम.एस्सी ( ऑरगॅनिक कॅमिस्ट्री ) व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळावी म्हणून सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला होता त्यास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आर.के.दातीर यांनी दिली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाने गुणवत्ता जपली आहे. उत्कृष्ठ निकाल,प्रशस्त लॅब, शैक्षणिक गुणवत्ता यांमुळे विद्यालयाचा रायात मोठा लौकिक आहे. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मागणीवरुन वाढीव तुकडीसाठी महाविद्यालयाने महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. याकामी संस्थेचे सचिव चंद्रकांत पा.कडलग, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ.आर.के.दातीर, उपप्राचार्य प्रा.एस.डी.नवले , प्रा.जी.जे.थोरात, कार्यालयीन अधिक्षक जी.एन.पानसरे व केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ.एस.एस.बोर्‍हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभ्यासक्रमास इच्च्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश निश्‍चीत करण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.दातीर यांनी केले आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात , आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी अभिनंदन केले आहे.