अमृतवाहिनी डि फार्मसीला उत्कृष्ट दर्जा
संगमनेर ( प्रतिनिधी ) गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देतांना विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास,लायब्ररी,प्लेसमेंट, भव्य इमारत व आधुनिक सर्व सुविधा असलेल्या अमृतवाहिनी फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2017 - 18 साठी उत्कृष्ट दर्जा मिळाला असल्याची माहिती प्राचार्य प्रा.मनोज शिरभाते यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची सुविधा देण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1983 साली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. राज्याचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने रायपातळीवरील अनेक गौरव प्राप्त केले आहे. संस्थेतील विविध सुविधा प्लेसमेंट सुविधा टिचींग लर्निंग,संशोधन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,शैक्षणिक दर्जा.निसर्गरम्य परिसर,स्वच्छता,होस्टेल सुविधा,भोजन व्यवस्था,मुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था या सर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राय तंत्रशिक्षण मंडळ मुंबई उत्कृष्ट दर्जा दिला आहे.तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाबाबद समाधान ही व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर नोकरी देण्यासाठी अमृतवाहिनीत विविध कंपन्या इंटरव्हयूसाठी येत असतात. अनेक विद्यार्थ्यांची यात निवड झाली आहे. याही वर्षी अमृतवाहिनी फार्मसीने कायम उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
उत्कृष्ट दर्जा मिळविण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल महाराष्ट्र रायाचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात,विश्वस्त आ.डॉ सुधीर तांबे, सौ. शरयुताई देशमुख,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, केशवराव जाधव, प्रा.डॉ.चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.