Breaking News

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल


सातारा : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फलटणमध्ये एका युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला फलटण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती, पप्पूसिंग चितोडिया याने एका अल्पवयीन मुलीला तुला खाऊ देतो, तू माझ्याबरोबर चल असे म्हणत त्या मुलीचा हात पकडून वाईट हेतूने तिला ओढू लागला. यावेळी त्या मुलीने हिसका देऊन ती घाबरून पळून आली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार मामाला सांगितला. संबंधित युवक कारखाना रोडने चालत जात असल्याचे समजल्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो सापडल्यानंतर त्याला तेथील लोकांनी बेदम चोप दिला व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.