Breaking News

मोकळा कांदा पद्धत सुरु करण्याची मागणी


कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फक्त गोणीमधील कांदा लिलाव पद्धत सुरु आहे. अनेक दिवसांपासून येथेही मोकळा कांदा लिलाव पद्धत सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र तो प्रश्न जागेअभावी प्रलंबित राहिला होता. आज {दि. १२} पंचायत समिती माजी सभापती सुनील देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकऱ्यांनी मोकळा कांदा पद्धत सुरु करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी रक्ताटे यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव येथे मोकळा कांदा पद्धत सुरु करण्यात आल्यानंतर बाहेरगावी मोकळा कांदा घेऊन जाणारे शेतकरी कोपरगाव येथे येण्यास प्राधान्य देतील. कोपरगावची बाजारपेठही वाढेल व शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होईल. यासाठी जागा उपलब्ध असून हमालांची संख्या वाढून घ्यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा पद्धत लवकर सुरु करावी. 

दरम्यान, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर म्हणाले, विंचूर येथे मोकळा कांदा लिलाव सुरु होऊन प्रगतिपथाकडे आहे. त्याच धर्तीवर कोपरगाव येथेही मोकळ्या कांद्याची लिलाव सुरु व्हावे. कारण बाजार समितीकडे जागाही उपलब्ध आहे. फक्त हमालांची संख्या वाढवावी लागेल.