Breaking News

देवळाली प्रवरात सुशोभिकरणाच्या नावाखाली अनाधिकृतपणे पुतळा उभारणी



राहुरी(विशेष प्रतिनिधी- येथील श्रीरामपुर रसत्यालगत सोसायटी चौकात शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावर आण्णासाहेब कदम यांचा उभारलेला पुतळा वाहतुकिला अडथळा निर्माण होत असून सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलुन व अवमान करुन सुशोभिकरणाच्या नावाखाली पुतळा व त्याजवळ सुरु असलेले अनाधिकृत बांधकाम तात्काळ काढून घ्यावे अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ कदम व आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हंटले आहे की सार्वजनिक रस्त्यात पुतळा उभारणीस किंवा बांधकाम करण्यास राज्य सरकारला परवानगी देता येणार नाही.असे सुप्रीम कोर्टाने पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह अपील सिव्हिल नंबर(एस) ८५१९/२०१६ च्या ४ च्या पॅरोमध्ये दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हंटले आहे. असे असताना देवळाली प्रवरा येथे राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपुर हा राज्य महामार्ग घोषित आहे. या रस्त्यालगत देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसयटीच्या समोर व देवळाली प्रवरा शहरात जाणाऱ्या मुख्य चौकात सुप्रीम कोर्टाचे सन २०१६ चे आदेश डावलुन सन २००९ मध्ये आण्णासाहेब कदम यांचा अनाधिकृतपणे पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारताना सुप्रीम कोर्टाचे पालन केलेले नसून अवमान केला आहे. सध्या या ठिकाणी सुशोभिकरण करुण मोठ्या प्रमाणात वाहतूकिस अडथळा निर्माण केला आहे.अनेक छोट- मोठे अपघातही घडत असतात. तरी सदर पुतळा तात्काळ काढून पुतळ्याजवळ चालू असलेले अनाधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे. अन्यथा याप्रकरणी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात येईल असे बापूसाहेब कदम व सुरेंद्र थोरात यांनी लेखी तक्रारीत म्हंटले आहे.