सावळीविहीर परिसरात अवैध धंद्यांवर छापे
शिर्डी / प्रतिनिधी
सावळीविहीर परिसरात रुई रस्त्यालगतच्या ग्राहकांकडून पैसे घेऊन मटका खेळविला जात असल्याची खबर शिर्डी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून संशयित आरोपी नारायण विश्वनाथ चिखले याच्याकडून ५८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्याच्याविरोधात मटका मुंबई जुगार अॅक्टप्रमाणे पोलीस नायक मारुती गंभीरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या कारवाईत नानासाहेब कारभारी खरात {रा. सावळीविहीर} याच्याकडून पोलिसांनी १ हजार १२० रुपये किंमतीच्या विदेशी कंपनी दारू ताब्यात घेतली.