Breaking News

पुलवामा न्यायालयाच्या आवारात दहशतवाद्यांचा हल्ला

पुलवामा - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या आवारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत तर तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसराला सैन्य व जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने वेढले असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. अनंतनाग जिल्ह्यातील जंगलत मंडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड भिरकावून हल्ला केला.

अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ला
जम्मू काश्मीरच्या सदार येथे मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 10 पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे 3 वाजता हा हल्ला झाला. जखमी पोलिसांना अनंतनागमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना श्रीनगर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पुलवामा जिल्ह्याच्या न्यायालयाच्या आवारात आज पहाटेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत तर तीन पोलीस जखमी झाले आहेत.