४० दिवसांत २८ दुचाकींची चोरी; नोंद मात्र बेवारसची
शिर्डी : शहर, उपनगर आणि साईबाबा हॉस्पिटल या परिसरातून गेल्या पाच दिवसांत ५ दुचाकी वाहने चोरीला गेली. अनेक महिन्यांत जवळपास २३ दुचाकी वाहने चोरीला गेल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांनी मात्र ही वाहने बेवारस असल्याची नोंद केली आहे.
भुरट्या चोरटयांनी ५ दिवसांत चोरांनी ५ दुचाकी वाहने चोरून शिर्डी पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार घेतलेल्या पो. नि. अरविंद माने यांना एकप्रकारे सलामीच दिली आहे. मागील महिन्यात २३ दुचाकी वाहने चोरीला गेली असतांना बेवारस वाहन या नोंद रजिस्टरला तशी नोंद केल्याचे दिसून आले. साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलच्या परिसरातून चार दुचाकी वाहने चोरी गेली आहेत. ज्याठिकाणी ही वाहने उभे केली जातात, त्याठिकाणी सी. सी. टी. व्ही. ची व्यवस्था नाही. त्याचा गैरफायदा हे दुचाकी चोर घेत आहेत. चोरीला गेलेल्या दुचाकी वाहनांची ही आकडेवारी पाहता दुचाकी चोरांनी एकप्रकारे शिर्डी पोलिसांना मोठे आव्हानच दिले आहे. या वाहनांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.