राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे विदयालयाचे यश
अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीतील प्रतिक्षा काळू डगळे तसेच कावेरी शिवाजी गोडे या दोन विदयार्थीनींनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या दोन्ही विद्यार्थिनी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीस पात्र झाल्या. त्यामुळे त्यांना इ. 9 वी. ते 12 वी. पर्यंत प्रतिवर्षी 12 हजार रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थीनींना शशिकांत कुलकर्णी, दिपक पाचपुते, कविता वाळुंज यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहर देशमुख, सचिव टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य अंतुराम सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी आभिनंदन करून, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.