झाडे लावण्याबरोबरच जोपासनाही महत्त्वाची - सुभाष देशमुख
सोलापूर - भविष्यात पाकणी गावाची ओळख ’चिंच बनाची पाकणी’ अशी व्हावी, झाडे लावण्याबरोबरच त्यांची जोपासना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाकणी ग्रामपंचायतीने के लेले वृक्ष संवर्धन निश्चित कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. पाकणी येथे एक हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पाकणी ग्रामपंचायतकडून गावाच्या रस्त्याच्या दुतर्फा व गावाच्या लगत वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला आहे. देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी
पाकणी गावाने पाच वर्षापूर्वी गावाच्या लगत दीडशे चिंचेची झाडे लावून त्याची उत्तम प्रकारे जोपासना केली आहे. या झाडांची पाहणी सहकार मंत्र्यांनी केली. यावेळी त्यांच्या हस्ते गावातील उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींना गॅस शेगडी, सिलिंडरचे वाटपही यावेळी करण्यात आले.