Breaking News

उत्तम आरोग्यासाठी खेळ हाच उत्तम पर्याय : कादरी


राजूर / वार्ताहर 
मनामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासठी तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी, शरीरही सुदृढ असणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य हेच सुखी यशाची गुरुकिल्ली असून, खेळ हाच पर्याय आहे असे प्रतिपादन क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये राजुर पोलीस स्टेशनचे पो. नि. कादरी पी. वाय यांनी व्यक्त केले. 
अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार, एस.डी.पी.ओ संगमनेर विभाग अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पारंपारिक क्रीडा स्पर्धा राजुर पोलिस स्टेशन व शैक्षणिक संकुल मोवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने मोवाशी यथे पार पडल्या. यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, धावणे, बुद्धीबळ यांचा समावेश होता. व्हॉलीबॉलमध्ये एकलव्यचे संघांनी तर कबड्डीमध्ये आदर्श संघानी बाजी मारली. वैयक्तिक धावणे स्पर्धेमध्ये एकलव्यच्या विद्या वसवे आणि आदर्शची खेळाडू अनिता कामडी यांनी प्रथम क्रमांक पटकावले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखाप्रमुख सुत्तर सर यांनी भूषविले, तर प्रास्ताविक नरके एस. एम यांनी तर, सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड यांनी केले. स्पधेच्या यशस्वीतेसाठी राजूरचे पो.कॉ. प्रविण थोरात, सुरेश कदम, पांडुरंग पटेकर, विजय मुंडे यांचे सहकार्य लाभले. तर पंच म्हणून तलेकर, कदम, चवडे, कासार सर यांनी काम पहिले तर, आभार राजेंद्र गायकवाड यांनी माणले.